राज्यातील आदर्श शिक्षकांची मागणी सोडवा ; किशोर पाटील कुंझरकर

0

जळगाव :  राज्य शासन वतीने देण्यात येणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक, केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक यांच्या मार्फत राज्यात सर्वत्र लोकप्रतिनिधींना भेटून राज्यातील सदरील पुरस्कार प्राप्तशिक्षकांना एसटी प्रवास सवलत कुटुंबियांसह मोफत मिळण्याचा लाभ व्हावा त्याच जोडीने पूर्ववत दोन वेतनवाढी देण्यात येत होत्या.

त्या मागील काही वर्षापासून बंद असल्याने महा विकास आघाडी सरकारने सुरू कराव्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर गुणवत्ता पक्षांवर निमंत्रित सदस्य म्हणून राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नेमणूक करावी या संदर्भात शासन निर्णय व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्यातील 38 शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव जळगाव जिल्ह्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा जिल्हा परिषद जळगावचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी किशोर पाटील कुंझरकर यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्वच पुरस्कारप्राप्त शिक्षक आपापल्या भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना भेटून निवेदने देत असून शासनाने कनवाळू होऊन या माफक व अल्प खर्च मागण्या दिवाळीपूर्वी सोडवाव्यात असे त्यांनी म्हटले.या भेट संवाद चर्चा मोहीमअंतर्गत दिनांक १३रोजी चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांना या मोहिमेविषयी माहिती देऊन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने संघटना लेटरहेडवर निवेदन दिले असता त्यांनी तात्काळ राज्यभरातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या भावना विचारात घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्र देऊन या प्रश्नांच्या संदर्भात योग्य ती सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली असल्याने राज्यातील राज्य शासन , केंद्र शासन, जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान राज्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी एक प्रकारची राज्यातील सर्वपक्षीय आमदार यांच्या समर्थनाची मोहीम राज्यात सुरू केली असून प्रलंबित प्रश्न सुटावेत यासाठी जवळपास १०३ अधिक आमदारांचे यासंदर्भात शिफारस पत्र मिळवले असल्याची माहिती या प्रसंगी बोलताना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली असून कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्री महोदयांनी यासंदर्भात विषय सूची वर विषय घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा असा आशावाद व अपेक्षा व्यक्त केली.मागील सरकारच्या काळात अंतिम टप्प्यात आलेल्या निर्णयाने हुलकावणी दिल्याने आपल्या मागण्यांबाबत पुरस्कार प्राप्तशिक्षकांमध्ये निराशा असल्याचे त्यांनी म्हटले.यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षाने सहानुभूतीपूर्वक विचार करून कुटुंबीयांना राज्यात एसटी बस सवलत प्रवास मोफत करावी व दिवाळी भेट द्यावी  अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे निवासस्थानी जाऊन देखील निवेदन देण्यात आले असून सदरील निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वीकारले  असून सकारात्मक पाठपुरावा करू असे म्हटलेआहे.यासंदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सकारात्मक असून सर्वांशी थेट बोलणे भेट संवाद व शिफारस पत्र घेणे सहकारी पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच समविचारी संघटना तसेच व्यक्तीश आपल्या मार्फत राज्यात सर्व जिल्ह्यात सुरू असल्याचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी स्पष्ट केले.राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे साहेब , राज्याचे उपमुख्य मंत्री नामदार अजित दादा पवार, शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड, ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ, विरोधी पक्षनेते नामदार देवेंद्रजी फडणवीस हे अभ्यासू व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व असल्याने तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या मागण्या अल्प खर्चिक असल्याने ते दिवाळीपूर्वी सकारात्मक निर्णय घेतील असा आपल्याला ठाम विश्वास असल्याचे शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त  शिक्षककिशोर पाटील कुंझरकर म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.