राज्याचे मुख्यमंत्री यांचे जळगावात आगमन

0

जळगाव :- धरणगाव व भुसावळ येथील विविध कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्वागत केले.

दरम्यान, धरणगाव रेल्वे स्थानकासमोरील क्रांतीकारी ख्वाजा नाईक स्मृती संस्थेतर्फे होणार्‍या जनजाती मेळाव्यासाठी मुख्यमंत्री जळगाव विमानतळावरून हेलीकाॅप्टरने धरणगावकडे रवाना झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.