राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर उद्या जिल्हा दौऱ्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र  राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर या शनिवार, दि. ७  ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे सकाळी ६.२५ वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन होणार असून तेथून त्या भुसावळ शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होणार आहेत.

ना. याशोमती ठाकूर ह्या सकाळी ८   वा. शासकीय विश्रामगृह येथून अकलूज, पाडळसे, बामणोद येथे कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. त्या पुढे  फैजपूर येथून महात्मा गांधी मार्गाने खिरोदाकडे प्रयाण, खिरोदा येथे कर्मयोगी धनाजी नाना चौधरी स्मृती मंदिर, खिरोदा येथे अभिवादन करतील. खिरोदा येथून रोझोदा/कोचूर/सावदा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून फैजपूरकडे प्रयाण करतील.

सकाळी १० वा. फैजपूर, येथे आगमन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीव्दारे आयोजित ‘व्यर्थ न हो बलीदान’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  फैजपूर येथील स्व. धनाजीनाना महाविद्यालय येथे रविंद्रनाथ टागोर यांचे पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यावेळ  दुपारी १२  ते १  वा. फैजपूर येथे राखीव असणार आहे. दुपारी १ वा. फैजपूर येथून यावल-किनगाव-चोपडा-शिरपूर मार्गे शासकीय वाहनाने चिमठाणा, ता. दोंडाईचा, जि. धुळे कडे प्रयाण करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.