राज्यस्तरीय चिंतन शिबिर एक सत्राध्यक्षपदी कवी विलास पाटील

0
चोपड्यात विलास पाटील यांच्यामाध्यमातून प्रथमच मान !
प्रतिनिधी I चोपडा
जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी ता. चोपडा येथील मुख्याध्यापक व तालुक्यातील मराठीचे ज्येष्ठ शिक्षक कवी विलास पाटील यांची
पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित आळंदी येथे दि. २२ते २४ डिसेंबर दरम्यान  होणाऱ्या ३ दिवसीय मराठी भाषा राज्यस्तरीय चिंतन शिबिरात ‘पाठयपुस्तकातील कवितांचे सादरीकरण ‘ या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मराठीचे अभ्यासू शिक्षक म्हणून परिचित विलास पाटील यांनी  या आधी बालभारती इ.८ वी मराठी पाठयपुस्तक समिक्षण समिती, इ.९वी मराठी विषय शिक्षक हस्तपुस्तिका निर्मिती समिती सदस्य , वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले असून  नगर येथे संपन्न महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या राज्याच्या ३ दिवसीय कृतिसत्राचेही अध्यक्षपद भूषविले आहे.पूणे जिल्हा मराठी अध्यापक संघाने खानदेशातल्या मराठी शिक्षकाला  एका सत्राचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान दिल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.