राजेंद्र घुगे-पाटील यांची मनपा स्थायी समिती सभापती पदी निवड

0

जळगाव- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे राजेंद्र घुगे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.  पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून राजेंद्र घुगे पाटील तर शिवसेनेकडून नितीन बरडे यांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या निवडी दरम्यान शिवसेनेचे नितीन बरडे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे राजेंद्र घुगे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडीची घोषणा केली.

महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीचे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.