राजू सूर्यवंशीचा आंदोलनाचा ईशारा, शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

0

भुुसावळ-

यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालायातील बोगसभर्तीबाबत देण्यात आलेल्या तक्रारींची दखल न घेतल्याने शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेगावकर यांनी शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा माध्यमिक विद्यालय मंदीर व कनिष्ठ महाविद्यालयात बोगस भरतीसह विविध १२ विषयांवर अनेक तक्रारी अर्ज व आंदोलने करुनही शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी तक्रारींची दखल घेतली नाही. याबाबत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेगावकर यांच्याकडे तक्रार देवून आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतच्या तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिका-यांंनी चौकशी करुन शिक्षणाधिकारी महाजन यांनी आपल्या कामकाजात हलगर्जीपणा केला तसेच वरिष्ठांच्या आदेशाची अवमानना केली असल्याने शिस्त भंगाची कारवाई का करण्यात येवू नये याबाबत खुलासा मागविला आहे. तीन दिवसात खुलासा सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे कारणे दाखवा नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.