राजू दादा फापोरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक दिनी शिक्षकांचा गौरव

0

अमळनेर (प्रतिनिधी) : ५ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक व पाणीपुरवठा सभापती प्रवीण गंगाराम पाटील(राजू दादा फाफोरेकर) यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच शिक्षक दिन असल्यामुळे शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी साने गुरुजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, शिक्षकांचा सत्कार करण्यात येऊन शिक्षकांना साने गुरुजींची प्रतिमा भेट देण्यात आली.यात निवृत्त मुख्याध्यापक बी.एच.पाटील, आर.पी.मुसळे,जे.पी.पवार, शिक्षक ठाकूर सर,मगरे सर,शाम पवार,डी.इ.पाटील, जे.एस.पाटील, डी.के.पाटील, नगरसेवक विवेक पाटील, दत्ता सोनवणे, चंद्रकांत पाटील, आर.जे.पाटील, राहुल बहिरम या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, संजय पाटील(भूत बापू),शरद पवार,जितेंद्र झाबक, निलेश पाटील, विनायक पाटील, अनिरुद्ध पाटील, हितेश पवार, मयुर साळुंखे, दिनेश पाटील, हरिश गहिवरे, अभिषेक ढमाळ, रवि साळुंखे, जितेंद्र पाटील, पप्पु पवार, अतुल सावकार, रोहित सैंदाणे, गणेश पाटील, विवेक पाटील, भुषण सनेर, प्रमोद पाटील, वैभव पवार, मंगेश शिरसाठ , पवन लोहार
तसेच राजू दादा फाफोरेकर मित्र परिवार व ढेकू रोड-पिंपळे रोड परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत.

Leave A Reply

Your email address will not be published.