मूल्याधिष्ठीत समाजसेवेसाठी समर्पित पंचाहत्तर वर्षा निमित्त सन्मान

जळगाव – राजयोगामुळे दिर्घायुष्य आणि मूल्यनिष्ठ जीवन जगण्यास मदत होते, आणि यामुळेच जनसामान्यांना यातून प्रेरणा मिळून त्यांच्या जगण्याची दिशा आणि दशा बदलविण्याचे महान कार्य ज्येष्ठ राजयोगी शांताराम पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहे. असे प्रतिपादन अमृत महोत्सवी कार्यक्रमात ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी काढले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ढाके कॉलनी सेवाकेंद्रात ज्येष्ठ राजयोगी शांताराम पाटील यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यात मिनाक्षीदीदी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, राजयोग आपल्या जीवनात धारण करुन जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यात आपले उभे आयुष्य समर्पित केले आहे त्यामुळे लौकिक जीवनात अनेक संकटांचा सामना करतांना केवळ राजयोगामुळे मिळालेल्या शक्तिने त्यांना सावरले आहे अशा शांताराम भाईंचे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक आहे, त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते.
ब्र.कु. पुष्पादीदी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, जगात काही व्यक्ति अशा जीवन जगतात की, त्यांच्या सेवेने अनेकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलते, अशा अलौकिक व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे राजयोगीनी शांताराम पाटील होय. भगीरथ इग्लिश स्कूलचे मेजर नाना वाणी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, शांताराम पाटील यांनी शांती, सदभावना, कस्र्णा आणि प्रेम यांचा संदेश देण्यास ज्यांनी आपले लौकिक जीवन समर्पित कस्र्न मानवसेवा हा धर्म मानला. आध्यात्मिक विचारवंत पी.ई.पाटील यांनी राजयोग तपस्येमुळे मनाची एकाग्रता कशी प्राप्त होते आणि ज्येष्ठ राजयोगी शांतारामभाईंनी ती कशी प्राप्त केली याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शुभेच्छा दिल्यात. तर ब्र.कु. वर्षा, ब्र.कु. संदिप , ब्र.कु. निता, प्रा. संजय पाटील, प्रा. विजय पाटील, प्रा. विजय मगर, संगीता पाटील, कु. पियुष यांनी समायोचित मनोगते व्यक्त केलीत. बी.बी. आबा पाटील यांनी शासकीय सेवेत असतांना मूल्यनिष्ठ जीवन कसे जगता येते त्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
कु. राजनंदिनी, आंचल, प्रांचल, खुशी यांनी स्वागत नृत्य सादर केले. सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी विद्या यांनी तर आभार मधूकर सोनार यांनी मानले.

