राजमुद्रा फाउंडेशन करणार कोरोना बाबत जनजागृती

0

अमळनेर(प्रतिनिधी)

अमळनेरात कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी याबाबत जागरूक असले पाहिजे.कोरोना आजार योग्य उपचाराने बरा होतो.याचाच भाग म्हणून राजमुद्रा फाउंडेशन तर्फे अमळनेरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप जोशी(MD) ज्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळात वैद्यकीय सेवा पुरवून अमळनेरकरांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. त्यांचं ऑनलाइन मार्गदर्शन राजमुद्रा फाउंडेशन या फेसबुक पेज वर १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळात आयोजित केले आहे.

या मार्गदर्शनात प्रामुख्याने कोरोनाची लक्षणे,प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धत, संतुलित आहार,रेमेडिसीवर इंजेक्शन चा वापर,लक्षणे दिसल्यानंतर  घ्यावयाची काळजी,डिस्चार्ग नंतर घ्यावयाची काळजी तसेच कुटुंबातील सदस्यांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या विषयांना सविस्तर पणे मांडण्याच काम डॉक्टर संदीप जोशी करणार आहेत. या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अमळनेर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.