राजमा खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का?

0

उत्तर भारतातील लोकांना सर्वात आवडता पदार्थ म्हणजे राजमा चावल, राजमा चविला जेवढा चांगला आहे. तेवढाच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आपल्यापैकी अनेक लोक राजमा खाण्याचे शौकीन असतात. त्यात  प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स सारख्या अनेक आवश्यक पोषक तत्त्वांचा राजमा हा खजिना आहे. यास किडनी बिन्स म्हणूनही ओळखले जाते आणि वजन कमी करण्यास देखील राजमा मदत करतो. यामुळे बरेच लोक वजन कमी करताना राजमाचे सेवन देखील करतात.

-राजमा खाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही हंगामात राजमा रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणाच्या वेळी राजमा नेहमी खा. यामागचे कारण असे आहे की राजमा हे एक जड अन्न आहे जे पचनासाठी थोडे जड आहे. रात्रीच्या जेवणामध्ये राजमा खाल्ल्यास पोटात जडपणा, गॅस, झोपेची कमतरता, पोट साफ होत नाही, पोटदुखी, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी राजमा खाल्ला नाही पाहिजे.

-राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते. म्हणजे ते खाल्ल्याने पाचन क्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचे पोषण अॅब्जार्ज करू शकेल. परंतु याचा अधिकाधिक लाभ तुम्हाला हवे असल्यास भाजी बनवून खाण्याऐवजी उकडून खाणे अधिक चांगले आहे.

-हे मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात उपस्थित थायमाइन मेंदूची क्षमता वाढवते आणि अल्झायमर सारख्या आजारांना बरे करण्यास देखील मदत करते.

-प्रथिने, फायबरने समृद्ध असलेला राजमा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. राजमा खाल्ल्यानंतर राजमा खाल्ल्याने टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.