रांजणगाव शिवारातून मशी चोरणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

0

चाळीसगाव :-चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात बानगाव रस्त्यावर, शेतातील शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी म्हशी चोरून नेणार्या  टोळीतील दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या म्हशी  जप्त केले आहेत. या टोळीतील तिघे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

या घटनेने रांजणगाव परिसरात पशुधन मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती अशी की रांजणगाव येथील शेतकरी विजय नारायण धामणे यांच्या बानगाव रस्त्यावर शेत असून त्यांच्याकडे चार म्हशी होत्या, शेतातील त्यापैकी दोन म्हशी अंदाजे किंमत तेहतीस हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्या होत्या. धामणे पहाटे पाच वाजता दूध काढण्यासाठी शेतात गेले असता चार म्हशी पैकी दोन म्हशी चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेतली यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशन चे ए.पीआय हिरामण तायडे पो.का  राजेंद्र साळुंखे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना नांदगाव पोलिसांना दिनांक 14 रोजी नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही तरून म्हशी  कब्जात बाळगताना आढळून आले. या व्यक्तींच्या संशयित हालचाली वाटल्याने नांदगाव पोलिसांनी दोघांना म्हशी सोबत  ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या म्हशी त्यांनी रांजणगाव येथून चोरी केल्याचे उघड झाले. चौकशीत पाच जणांची नावे बाहेर आली नांदगाव पोलिसांनी या घटनेची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली व  दोघा आरोपींना चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले, पोलिसांनी मयूर उर्फ सोनू एकनाथ शिंदे (वय२२) व भूषण रामराव चव्हाण (वय २५) दोन्ही राहणार रांजणगाव तालुका चाळीसगाव यांना ताब्यात घेतले तर त्यांचे साथीदार अमोल राजेंद्र कोळी छोटू मधुकर पाटील मयूर आप्पा राजोळे सर्व राहणार रांजणगाव ते फरार असल्याचे तपास अधिकारी हिरामण तायडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.