रांजणगाव येथे तरुणांचा गुटखा सोडण्याचा संकल्प

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रांजणगाव येथील तरूणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला असून एक जानेवारी पासून गावात गुटखा  तसेच तसेच व्यसनयुक्त अवैद्य धंदे गावात विक्री होऊ देणार नाही आणि आम्ही सुध्दा गुटखा खाणार नाही असा संकल्प येथील श्री सद्गुरू माधवगिरी महाराज यांच्या मंदिरात व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली ,

गावात गेल्या अनेक दिवसापासून  गुटखा व तंबाखूने तरूण पिढी व्यसनाधीन होत  असल्याने, येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वसंतराव चव्हाण यांनी आपल्या सर्व तरुण मित्रांना एकत्र करून गुटख्याचे दुष्परिणाम सांगितले त्याचप्रमाणे सर्व मित्रांनीत्यांचे विचार ऐंंकून येथील श्री सद्गुरु  माधवगिरी महाराज या जागृत देवस्थानात एकत्रित येऊन  सर्व तरुणांनी गुटखा खाणार नाही तसेच इतरांना ही गुटखा खाण्या पासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करु, अशी शपथ घेऊन संकल्प केला, सदरचा संकल्प 1जानेवारी या‌ नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी केल्यानंतर आज आज पर्यंत या सर्व तरुणांचा मानसिक परीवर्तन होवून  गुटख्या सारख्या व्यसनापासून दूर राहत आहे या युवकांचा अत्यंत स्तुत्य अशा कार्यक्रमामुळे  गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे यापुढे सुद्धा  संपूर्ण गावातील  तरुणांना व्यसनापासून दुर ठेवण्याचा मनोदय  तरुण  नेतृत्व प्रमोद चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला,  माझे गाव पूर्ण व्यसनमुक्त करण्याचा मी संकल्प केला आहे मला आशा आहे की श्री सद्गुरु माधवगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने येथील तरुण गुटख्यापासून लांब राहतील असा मला विश्वास  असल्याचे चव्हाण म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.