जळगाव (प्रतिनिधी) : महामार्ग ६ वरील पिंप्राला गेटनजीकच गटार तुमल्यामुळे पिंप्राला गेटवरील भर रस्त्यावर गटाराचे पाणी आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळे काल दुपारी ३च्या सुमारास प्रवाशांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागला. गेट कडे रस्त्याचा उतार आल्याने रस्त्यावर अक्षरशः अर्धा फूट पाणी आले होते. रस्त्यात गटार आहे की गटारीत रस्ता हे प्रवाशांना कळत नव्हते. एकवाहनधारकाची मोटारसायकल स्लिप झाली असून बरी दुखापत होता-होता टळली.रस्त्यावर पाणी तुटल्यामुळे वाहनधारक , प्रवाशी,व शहरवासीयांना कमालीचा त्रासले आहेत तरी हे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी शहरवासीयांकडून मनपाकडे होत आहे.
महानगरपालिका मध्ये काही दिवसापूर्वी म.न.पा साफसफाई कर्मचारीयांनी पगार होत नसल्या कारणाने त्यांनी संप पुकारला होता.वेळेवर कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळेच ऐवडी मोठी समस्या निर्माण झाली असून .गटार तुमल्यामुळे कधी अर्धा फूट पाणी रस्त्यावर तुबत असेल तर प्रशासन व स्थानिक प्रतिनिधी झोपा काढते आहेत का ? असा सवाल नागरी करत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अशा मूलभूत कामांकडेतरी लक्ष देऊन कामे मार्गी लावाव्या एवढ्या माफक मागण्या नागरिकांकडून आहेत.