भडगाव : तालुक्यातील शिवणी येथील भुषण भाऊसाहेब जाधव(वय25) हा रिक्षा चालक हा शिवणी कडून खेडगाव येथे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेली जमिनीच्या सपाट असलेली विहीरीत रिक्षा समवेत पडुन ठार झाल्याची घटना काल रात्री आठ च्या सुमारास घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, भूषण जाधव हा तरुण अॅपे रिक्षा घेऊन शिवणी गावातील इंदीरानगर भागातुन गावाजवळुन जाणा-या एंरडोल-येवला राज्यमार्गाकडे येत होता .रस्त्याने असलेल्या एका शेतात कठडे नसलेल्या विहीरीत रिक्षा पलटी झाली.ग्रामस्थांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेवुन.त्यास बाहेर काढले त्यानंतर त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले असून या बाबत भडगाव पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.