मुंबई : ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे मुंबईत निधन झाले.
वयाच्या 78 व्या वर्षी माधव पाटणकर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आज (सोमवार 15 जून) त्यांचे निधन झाले.
रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते.