रविवारी जळगावात पन्नाशीनंतर….(व्हिडीओ)

0
जळगाव | प्रतिनिधी 
शहरात पहिल्यांदा पन्नाशीनंतर अभिनय भन्नाट असा उपक्रम नितीन बापट येत्या रविवारी व वा वाचनालयाच्या सभागृहात करणार असल्याची माहिती बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवृत्तिनंतरचा काळ हा माणसाच्या आयुष्यातला ‘सुवर्णकाळ’ असतो. सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन मनसोक्त जीवन जगण्याची ही सुखी वर्ष. ह्याच सुवर्णकाळची जाणिव करून देणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आयोजण्यात आलेला असल्याचे बापट यांनी सांगितले.
अतिशय समाधानी व परिपूर्ण आयुष्य जगण्याची जणू गुरुकिल्लीच ह्या कार्यक्रमाद्वारे समाजातल्या पन्नाशी उलटलेल्या लोकांना  मिळणार आहे. हसत-खेळत अनेक दुर्लक्षित बाबींना समोर ठेवत एक सामाजिक उपक्रम म्हणून   नितीन  बापट ह्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य ठेवलेला आहे. गेल्या रविवारी असाच निमंत्रितांसाठी पन्नाशीनंतर कार्यक्रम झाला या अभिनव उपक्रमास उपस्थित त्यांच्या आग्रहामुळे येत्या रविवारी म्हणजे ता. २४/जानेवारी रोजी हा कार्यक्रम पुन्हा होणार आहे.
      हा एक कार्यक्रम नसून एक उपक्रम आहे. ह्यापुढे ह्याच विषयावरच्या अश्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील निवृत्ती घेतलेल्या वा होणाऱ्या व्यक्तींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री. बापट ह्यांनी केले.
फक्त पन्नास जणांची बैठक व्यवस्था असल्यामुळे कृपया फोन करून आपली जागा आरक्षित करण्याची विशेष विनंती. नितीन बापट यांनी केली आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक ९२२५७१२९५४/ ७६२०२१८७५७ आहेत.
 
व्हिडीओ पाहा…

 

Leave A Reply

Your email address will not be published.