जळगाव : शहरातील उद्योजक आणि खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन यांच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या आगीत महत्वाची कागदपत्रे जळाले आहे.
खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन यांचे खान्देश मिल कॉम्लेक्स भागात कार्यालय आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे लक्षात आले त्यावेळी कार्यालय बंद होते . शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले . तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या २ बंबांनी हि आग आटोक्यात आणली . या आगीत महत्वाची कागदपत्रे जळाल्याची माहिती देण्यात आली . अन्य नुकसानीचा तपशील मात्र लगेच समजू शकला नाही .