रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता व रस्ता दुरुस्तीची मागणी

0

भुसावळात मुस्लिम बांधवांचे पालिकेला निवेदन
भुसावळ | प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरु असून या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता व रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी आज मंगळवार १४ मे रोजी नागराध्यक्ष व मुख्याधिकारी याना दिलेल्या निवेदनाद्वारे मुस्लिम बांधवानी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते रजा टॉवरपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची रमजान ईदपूर्वी डागडुजी करून रस्ता व्यवस्थित करावा. ईदच्या दिवशी व ईदच्या आदल्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात यावा. आनंद, बंधुभाव, प्रेम, त्यागाचे प्रतीक असणाऱ्या ईद सणानिमित्त समाज बांधव घराची व परिसराची स्वच्छता करीत असतात. या पार्श्वभूमीवर मोहम्मद अली रोड (खडक रोड) तसेच आगाखान वाडा ते जाम मोहल्ला पर्यंतच्या रस्त्यावर असलेला नाला तुडुंब भरला असून त्याची साफसफाई ईद पूर्वीच करण्यात यावी. नमाज पठण, रोजा इफ्तारसाठी मुस्लिम बांधवांना या घाणीतूनच मार्गक्रमण करावे लागते. यासाठी या नाल्याची सफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक साबीर शेख, मुनहिंद शेख शकील, नगरसेवक जावेरा बी शेख शब्बीर, नसीम बाबू तडवी, ऍड. एहतेजन मलिक, तौसिफ़ खान खुदायार खान, अब्दुल लतीफ, जमील खान, निसार अहमद, जावेद खान, जावेद अहमद आदींच्या स्वाक्षऱ्या  आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.