रन भुसावळ रन सिझन 3 रविवार 5 जानेवारी 2020, आज स्पर्धकाना टीशर्ट व किटचे होणार वाटप

0

भुसावळ – सालाबादाप्रमाणे यावर्षी सुध्दा रन भुसावळ रन सिझन 3 चे रविवार 5जानेवारी 2020 रोजी आयोजन केलेले आहे. हे रन 3 कि.मी., 5 कि.मी. व 10 कि.मी. अंतरासाठी असून स्पर्धेचे वैशिष्ट यामधे 10 कि.मी.ची स्पर्धा अत्याधुनिक आर.एफ.आ.डी. ( Redio Frequency Identification) या पध्दतीने होणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रायोजक समिती : या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक भुसावळ तालुक्याचे आमदार. संजयजी वामन सावकारे, राह प्रायोजक सिध्दीविनायक ग्रुपचे चेअरमन  कुंदन ढाके , गोदावरी फाऊंडेशचे चेअरमन, डॉ.उल्हासजी पाटील, बियाणी ग्रुप ऑफ ऐज्युकेशनल इस्टिटयूटचे मनोज बियाणी, यांचेसोबत सुमारे 250 समन्वयक यासाठी परिश्रम घेत आहेत. यांची राहणार प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी  अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, आमदार संजय वामन सावकारे, जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ राजीव पूरी, अ .जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ सुधिर मलिक,  मिलीटरी स्टेशनचे कमांडर  करण ओहरी, डी.आर.एम. विवेककुमार गुप्ता,प्राताधिकारी रामसिंग सुलाने ,  रमण भोळे( नगराध्यक्ष )दिपनगर प्रोजेक्ट सी.ई.पी ऐ. सपाटे,दिपनगर सी.ई विवेक रोकडे साहेब, सिध्दीविनायक ग्रुपचे चेअरमन. कुंदन ढाके, गोदावरी फाऊंडेशचे चेअरमन, डॉ. उल्हासजी पाटील, बियाणी ग्रुप ऑफ ऐज्युकेशनल इस्टिटयूटचे .मनोज बियाणी, त्याचप्रमाणे भुसावळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ.करूणा डहाळे , या उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी विविध समित्यां गठित करण्यात आल्या असून यात —  स्टेज व व्हीआईपी समिती इंचार्ज डीवायएसपी गजानन राठोड , यतीन ढाके , शुभम महाजन , सब इंचार्ज – पो नि.बाबासाहेब ठोंबे, दिलीप भागवत, रामकृष्ण कुंभार  मैदान समिती विकास पाचपाण्डे, अजय भोळे, मनीष नेमाडे, एपीआय अनिल मोरे , सपोनी केटी सुरलकर,

साउंड कमीटी वरुन इंगळे, टी शर्ट वाटप समिती ४ जानेवारी २०२० प्रविण फालक सर, वरुण इंगळे, प्रविण पाटिल, डॉ प्रविण वारके , मेडिकल अँड मेडल सर्टिफिकेट समिती  समीर पाटिल, चेतन पाटिल, डॉ प्रविण वारके, मार्शल पॉयलट समिती रमण भोळे,प्रविण पाटिल सर, निकाल समिती, प्रविण फालक सर, डॉ तुषार पाटिल, पो.नि.रामकृष्ण कुंभार , मेडिकल डॉ तुषार पाटील , वॉटर अँड एनर्जी ड्रिंक समिती रवि निमाणी व अनिल आर चौधरी, मार्ग (रुट ) समिती -रमण प्रविण फालक सर, वरुण ईगळे, रणजीत खरारे, प्रविण पाटिल सर, ब्रेकफ़ास्ट अनिल चौधरी व नितिन धांडे तसेच मीडिया समिती मनीष नेमाडे, ऍड तुषार पाटिल यांचा समावेश आहे .

आज किटचे वितरण स्पर्धकांना दि. 4 जानेवारी 2015 रोजी संतोषी माता हॉल, प्रोफेसर कॉलनी येथून सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किटचे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत धावणार सुमारे 2200 स्पर्धक या स्पर्धेसाठी सुमारे 2200 स्पर्धेक धावणार असून स्पर्धापूर्ण झालेवर स्पर्धकांना मेडल,सर्टिफिकेट व नाश्ता देण्यात येणार आहे. . स्पर्धेची वेळ या स्पर्धेसाठी 10 कि.मी.अंतरातील स्पर्धकांनी पहाटे 5.15 वाजेला उपस्थिती दयावी व स्पर्धा  6 वाजेला स्पर्धा सुरू होईल. 05 कि.मी.अंतरातील स्पर्धकांनी पहाटे 5.40 वाजेला उपस्थिती दयावी व स्पर्धा 06.20 वाजेला स्पर्धा सुरू होईल.. 03 कि.मी.अंतरातील स्पर्धकांनी पहाटे 06.15 वाजेला उपस्थिती दयावी व स्पर्धा  7 वाजेला स्पर्धा सुरू होईल.

स्पर्धेचा मार्ग

या स्पर्धेसाठी 03 कि.मी. अंतरासाठी मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पुल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड पासून युटर्न घेवून पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान तर 05 कि.मी. अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवन पासून युटर्न घेत पुन्हा त्याच मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान त्याचप्रमाणे 10 कि.मी.अंतरासाठी अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पुल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवन पासून युटर्न घेत वसंत टॉकीज रिक्षा थांबा, दोन नंबरचे पेट्रोल पंपाजवळून डाव्या बाजूला वळत, टेक्नीकल हायस्कुलमार्ग, सरदार वल्लभभाई पुतळा, कोनार्क हॉस्पीटल (लाईफ केअर हॉस्पीटल), वाय पॉईटपासून युटर्न घेत पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान याठिकाणी स्पर्धा संपणार आहे.असे मीडिया विभागाचे मनीष नेमाडे ,  व ऍड तुषार पाटिल यांनी कळविले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.