पारोळा प्रतिनिधी तालुक्यातील रत्नापिंप्री येथे गृप ग्रामपंचायतीत अपंग क्रांती संघटनेने आज सकाळी नऊ वाजता निवेदन दिले यात शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या रक्कमेतून पाच टक्के रक्कम अंध अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी वापरावी लागते आणि याचा लाभ संबंधित अंध अपंग दिव्यांग व्यक्तींना झाला पाहिजे यासाठी आज प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सदस्यांनी ग्रामपंचायतीला सोमवारी सकाळी नऊ वाजता निवेदन दिले हा निधी तात्काळ देण्याचे ही निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदन ग्रामसेवक दीपक भोसले यांना देण्यात आली यावेळी उपसरपंच सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, विजय पाटील, सुरेश पाटील यांच्यासह अपंग संघटनेचे जितेंद्र पाटील, वसंतराव मनोरे, सुनेंद्र भोसले, मनीषा पाटील, विलास बिरारी ,भिकन कसबे, विष्णू कसबे ,देवकाबाई भिंगाणे, शितल मनोरे ,दिनकर पाटील , माधवराव कुंभार ,बापू सरदार, खटाबाई मनोरे, विश्राम धनगर, दीपक भागवत ,राहुल पाटील ,मगनराव पाटील ,सखाराम कुंभार, दीपक पाटील आदी उपस्थित होते .