रत्नागिरी :- रत्नागिरीतील संगमेश्वर, चिपळूणात तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली असून तिथली वाहतूक वळविण्यात आली आहे. पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, सह्याद्री खोऱ्यातील 32 गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा जनसंपर्क तुटल्याचे समोर येत आहे. तसेच जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून पुलावरील वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकरांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.