अमळनेर प्रतिनिधी येथील भोई वाडा परिसरातील रहिवाशी तथा त्रिमूर्ती ट्रेडिंगचे संचालक रतन शिवराम महाजन (वय ६५) यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाले. दोंडाईचा येथील तहसीलदार सुदाम महाजन, उत्तम महाजन, साहेबराव महाजन, हिम्मत महाजन यांचे ते बंधू, शिरपूर येथील एस कुमार ट्रेडिंग कंपनीचे मालक सुरेश माळी यांचे सासरे तर रवींद्र महाजन, भूषण महाजन यांचे वडील होत.