वरणगाव – शहरातील आंबेडकर नगर मध्ये रात्री १० .३० वाजेच्या सुमारास जुन्या वादाची कुरापत काढून येथील रहिवाशी असलेल्या तरुणास चौघानी धारदार शस्त्राने अंगावर आठ ते दहा वार वरून खुन केल्याची घटना सोमवारच्या रात्री घडली असून चौघा संशयीताना रात्रीच पोलीसांनी अटक केली आहे.
शहरातील डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळ्या जवळील महालक्ष्मी सॉमील च्या समोर ही घटना घडली असुन पोलीसानी चौघ संशयीत रोहीत किशोर तायडे , अजय रविन्द्र तायडे , राहुल गजानन कदम , अक्षय संजय भैसे यांना अटक करण्यात आली आहे .
या बाबत पोलीसानी दिलेल्या प्राथमिक माहीती नुसार असे की मागील सहा महिण्यापुर्वी याच भागातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीच्या लहान नातीचा वाढदिवसला धक्का लागल्याच्या कारणावरूण मयत व आरोपी मध्ये वाद झाला होता व तो मिटलाही होता मात्र सोमवार च्या रात्री तो वाद पुन्हा उफाळल्याने घटना घडल्याचे पोलीसानी सागीलते आहे .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.