Saturday, October 1, 2022

रचनात्मकता

- Advertisement -

सर्वप्रथम  रचनात्मकता  म्हणजे काय,  याबद्दल लोक काय समज ठेवतात- काही शोध लावणे, कविता लिहिणे, लेख लिहिणे, विज्ञानाचे प्रयोग यालाच लोक रचनात्मकता समजतात. काही नवीन शोध म्हणजेच रचनात्मकता असा सर्वसामान्यांचा समज आहे.

- Advertisement -

पण खरेच रचनात्मकता म्हणजे एवढेच का ? सर्व शोध ,कविता, लेख ,प्रयोग हे रचनात्मकता मुळेच आलेले आहेत यात काहीच शंका नाही पण रचनात्मक विचारसरणी एक एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. आज आपण मंगळावर पोहोचलो आहोत हे रचनात्मकते मुळेच घडलेले आहे. परंतु रचनात्मकता या पुरतीच मर्यादित नाही खूप हुशार आणि अति बुद्धिमान लोक हेच रचनात्मक असू शकतात असे नाही. याचे उत्तम उदाहरण आहे.  सुंदर पीचाई गुगलचा सीईओ? नाही मी यालाच रचनात्मकता मानणार नाही. पण एका मिडल क्लास फॅमिली मधले त्या मुलाचे आई वडील जेव्हा त्याला उच्चशिक्षणासाठी प्रयत्नशील होतात त्याला आपण रचनात्मकता म्हणतो. प्रतिकूल परिस्थितीत पुढे गेलेला तो सुंदर पीचाई किंवा असे महान लोक एकाच परिस्थितीत निरनिराळे मार्ग शोधून करणारे असतात.

- Advertisement -

- Advertisement -

उदाहरणार्थ एक साधा सेल्समॅन एसटी महामंडळाच्या बसमध्ये एक पेन विकतो आणि त्यासाठी तो असं काही प्रस्तुत करतो त्यामुळे तो त्या पेनला आपल्याला विकू शकतो किंवा एक सेल्स मॅनेजर आपल्या टीमला एक असंभव टार्गेट देऊन त्यांना काही बोलून प्रेरित करतो त्याला पण रचनात्मकता म्हटल्या जाईल. रचनात्मकतेचा खरा अर्थ हाच आहे की कोणत्याही कामाला यशस्वी करण्यासाठी आणि ते कमी वेळेत पूर्ण होण्यासाठी केलेला सकारात्मक विचार आणि नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली विचारसरणी.

यासाठी एका महान लेखकाने काही टिप्स दिल्या आहेत. त्या मी तुमच्या समोर शेअर करतो आहे.

स्टेप वन– विश्वास ठेवा की हे काम तुम्ही करू शकता. हे एक मूळ सत्य आहे कि कोणत्याही कामाला करण्याच्या आधी तुम्हाला तसा विचार करावा लागेल.” हे काम मी करू शकतो “एक वेळा तुम्ही विचार केला की हे काम तुम्ही करू शकता तर तुम्ही त्या कामाला करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढता. तुमचा मेंदू त्याप्रमाणे काम करतो आणि तुमचे काम ठराविक वेळेत संपन्न होते. तुमच्या शब्दावलीतला असंभव हा शब्द काढून ठेवा. माझ्या जुन्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर नेहमी म्हणायचा “युवर आय कॅन इज मोर इम्पॉर्टंट ध्यान युवर आय क्यू”.

 स्टेप टु– नेहमीच्या कार्यशैलीत बदल घडवून नवीन विचारांना स्वीकार करा. प्रयोगशील बना. नवीन शैलीला आत्मसात करा आणि आपल्या प्रत्येक कामात प्रगतिशील व्हा.

 स्टेप थ्री– आपल्या मेंदूला अशी सवय लावा की रोज मी या कामाला कोणत्या वेगळेपणाने करू शकतो? आत्म सुधारायची कोणतीही सीमा नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता तेव्हा तुम्हाला बरीच उत्तरे मिळतील.

 स्टेप फोर– काम करण्याची क्षमता ही एक मानसिक अवस्था आहे.  जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करून स्वतःला विचारता तर डोक्यात आपोआप चांगले शॉर्टकट निर्माण होता. व्यापारात पण हेच यशस्वी होतात आपल्या कामाला सतत सुधारित पद्धतीने करत राहणे , व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणते.

 स्टेप फाईव्ह– स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावा आणि ऐकण्याची ताकद वाढवा. तशी स्वतःला सवय लावून घ्या. या सवयी मुळे आपल्याला जे काम करायचे आहे त्याचे नवीन मार्ग मिळून जातील. नेहमी लक्षात ठेवा मोठ्या यशस्वी लोकांची ऐकण्याची क्षमता म्हणजे लिसनिंग पावर खूप असते आणि अयशस्वी लोक फक्त बोलण्यात वेळ घालवतात.

 स्टेप सिक्स– आपल्या बुद्धीला व्यापक बनवा. दुसऱ्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्या. नेहमी आपले फ्रेंड सर्कल म्हणजेच मित्रपरिवार असा निवडा ज्यांनी तुम्हाला नवीन विचार, काम करण्याचे नवीन मार्ग शिकायला मिळतील. लक्षात ठेवा चार यशस्वी माणसांसोबत तुम्ही राहाल तर याची संभावना वाढून जाते की पाचवे यशस्वी व्यक्ती तुम्ही असाल.

 स्टेप सेवन– आपल्या विचारांना विकसित करा आणि एका परिचित आणि महत्त्वपूर्ण यशस्वी माणसाच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. उदाहरणार्थ -एक्स वाय झेड… व्यक्ती

 

⦁ जेव्हा मी चिंताग्रस्त होतो- त्या व्यक्ती ला अनुसरून काय यावेळी ती एक्सवायझेड व्यक्ती या गोष्टीची परवा करणार किंवा चिंता करणार ? ती व्यक्ती या गोष्टीमुळे बाकीच्या कामांवर परिणाम होऊ देणार का?

⦁ एक नवीन विचार किंवा संधी- जर हा विचार त्या एक्सवायझेड व्यक्तीकडे असता तर त्यांनी काय केलं असतं? त्यांनी संधीचे सोने करण्याकरिता कोणते पाऊल उचलले असते?

⦁ स्वतःचं व्यक्तिमत्त्व- जर हे व्यक्तिमत्त्व एक्स वाय झेड असते तर त्यांनी या व्यक्तिमत्त्वाचा विकासासाठी काय केलं असतं?

⦁ माझी भाषा- काय मी त्या एक्सवायझेड व्यक्ती सारखी भाषा बोलतो किंवा त्या यशस्वी माणसं सारखी भाषा बोलतो?

⦁ मी जे वाचतो- काय ती एक्सवायझेड व्यक्ती या प्रकारचे वाचन करत असेल आणि या वाचनाने त्याला त्याच्या ध्येय जवळ जाता येईल का?

⦁ जेव्हा मला कोणत्या व्यक्तीचा किंवा गोष्टीचा राग येतो- काय ती एक्सवायझेड व्यक्ती या गोष्टीसाठी राग करेल किंवा यासाठी तो आपला वेळ वाया घालवेल?

⦁ जेव्हा मी विनोद करतो- काय ती एक्सवायझेड व्यक्ती या प्रकारचे विनोद करेल का?

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काय ती एक्सवायझेड व्यक्ती याप्रमाणे काम करत असेल? मी जेव्हा अशा विचारांचा सामना करतो तेव्हा मी माझ्या परिचित व्यक्ती विनोद बीडवाईक  यांचा विचार करतो. ते एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक आहे ते सध्या अल्फा लावेल या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट अंड सी एच आर ओ( मिडल ईस्ट अंड अशिया) आहेत सोबतच ते विविध प्रकारांच्या पुस्तकांचे लेखक आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या परिचित एका यशस्वी आणि सकारात्मक व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करू शकता. खरी रचनात्मकता इथे आहे. एकदा करुन तर बघा.

 

– ऋषिकेश मुकुंद पिहूलकर- 8208407724

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या