रक्षा खडसे तरुणच नाही तर कार्यक्षम खासदार – देवेंद्र फडणवीस

0

जळगाव :– राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरणगाव व भुसावळ येथील विविध कार्यक्रमासाठी जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. भाजपचा लोकप्रतिनिधी हा उत्तरदायी असला पाहिजे. जनतेसाठी त्याने काय केले आहे हे सांगण्याची गरज आहे खासदार रक्षा खडसेंच्या कार्याचा अहवाल समर्पण वादी आहे. खा. रक्षा खडसे ह्या तरुणच नाही तर कार्यक्षम खासदार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तव्य  भुसावळ येथील कार्यक्रमात केले. यावेळी  नगरपालिका उद्यानासह प्रशासकीय ईमारतीचे व आमदार निधीतील उद्यानाचे रीमोटद्वारे विकासकामांचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

नाथाभाऊनी लावून ठेवलेल्या कृषी विद्यापीठाचे कामे लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी लवकरच निधी दिला जाईल. मेगा रिचार्ज प्रकल्प हा जगातला मोठा आजूबा असून तो देशाचे भवितव्य असल्याचे व्यक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, रेल्वे क्रोसिग पूल तयार झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे उड्डाण पूल तयार झाले आता सहज प्रवास होईल. भुसावळ मधील घरांना तवत्व मंजुरी देण्यात आली असून, सरकार गरीब जनते करता काम करत आहे. उद्या कॅबिनेट च्या बैठकीत त्याला जाहीर मंजुरी देखील दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या समर्पण कार्यवृत्तांतचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समवेत माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार राजू मामा भोळे, आमदार स्मिताताई वाघ, साधना महाजन आमदार चंद्रकांत सोनवणे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.