रक्षा खडसेंची बदनामी; जिप सदस्याच्या भावावर गुन्हा दाखल

0

भुसावळ :- खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र पाटील यांचे बंधू प्रमोद पाटील यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

२७ मे रोजी साकेगाव येथील भाजपचे कार्यकर्ता संजय पाटील यांनी पोस्ट टाकली होती. यावर प्रमोद पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या विषयी आक्षेपार्ह कमेंट टाकली. पोस्ट टाकून ती काही वेळानंतर डिलीट केल्याचे भाजपा पदाधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.