खामगांव (प्रतिनिधी) शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या ९० व्या बलिदान दिनानिमित्त २३ मार्च रोजी रक्तसेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढी मध्ये गरजू रुग्णांसाठी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून व तसेच शहिद भगतसिंग यांच्या पुतळयाला हाल फूल मालार्पण घालून रक्तदान केल्या नंतर शहीदांना भावपूर्ण श्रद्धाजंली देऊन बलिदान दिवस साजरा केला. एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविन्यात आला.
यावेळी शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ. देशमुख, सौ. राजश्री पाटील, सौ. देशपांडे, कु. माहोदे, अशोक पराते आदि लोकांनी सहकार्य केले. या रक्तदान शिबीरात विक्की गोस्वामी, प्रदीप शमी, संतोष शेगोकार, अमोल मुकुंद, अवि राठोड, सचिन पवार, मनीष मुळे, युवराज भाटी, दिपक महाले, मंगलसिंग चव्हाण, अनुज खोडके, नागेश खिरोडकार, गणेश काळे, अजिंक्य झाडे, वैभव पगदुने, शुभम अजडीवाल, हर्षल खेडकर, चारुदत्त नेरकर, राजेंद्र कुटे, वैभव होनाळे, सोनु कौशर, सचिन सोनटक्के, तुषार विभूते, अभिनव अहीर, ज्ञानेश्वर वरखेडे, जितेंद्र मच्छरे, ज्ञानेश सेवक, अनिल शर्मा, अनिल चव्हाण, रवि दिपके, हिरालाल हजारे, प्रथमेश थेरोकार, विपुल चांडक, अंकुश अंबुलकार, प्रफुल मोहाना, विकास धान्दू यांच्या सह असंख्य रक्तदात्यांनी परिश्रम घेऊन शहिदांना भावपूर्ण श्रद्धाजंली दिली अशी माहिती रवि दिपके यांनी दिली.