रक्तदानाच्या कार्यास सर्वानी सहकार्य करावे ; मुख्याधिकारी संदिप चिद्रवार

0

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने  रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे .अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे .ही गंभीरबाब लक्षात घेवून समाज व राष्ट्रहिताच्या कार्यास सर्वानी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी आज  19 रोजी येथे आयोजित रक्तदान शिबिरात केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमिवर  हातभार लावावा याकरीता येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था ,गोपाल युवा बिग्रेड रक्तदाते , व  डॉ.बी.आर.आंबेडकर फाऊंडेशन यांच्यावतीने आज सोमवार रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले शिबिरात एकूण 15  रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

स्थानिक नेत्रम आय हॉस्पिटल ब्राम्हण संघा जवळ,आयोजित या शिबिराचे उद्घाटन  नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार,यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी  ते बोलत होते . प्रसंगी  डाॅ. सुवर्णा गाडेकर,डाॅ.सुनिल मेश्राम, यांचेसह  सौ.राजश्री नेवे,निलेश  फंड , व राहुल  पांडव उपस्थित होते.  समाजाचे आपण सुद्धा काही देणे लागतो अश्यात देशासह महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला  यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आपल्या समाजबांधव नागरिकांना मदत व्हावी हे लक्षात घेवून  शिबीर घेण्यात आल्याची भावना  आयोजकांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त  केल्या.

यावेळी  डाॅ. सुवर्णा गाडेकर,डाॅ.सुनिल मेश्राम, यांचेसह  सौ.राजश्री नेवे , निलेश  फंड , व राहुल  पांडव आदीं मान्यवर  उपस्थित होते .

प्रसंगी  शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वितेकरीता राजश्री नेवे, निलेश  फंड, व राहुल  पांडव यांचेसह अनुराधा टाक, दिलिप कुमार टाक, उमेश नेवे, सागर मुरलीया, यांनी परिश्रम घेतले तर नेत्रम हाॅस्पिटल, व भुसा‌वळ ब्लड बॅक यांचे रक्त संकलनासाठी मोलाचे   सहकार्य लाभले . रक्तदात्यांना सखी श्रावणी तर्फे वृक्ष रोप देण्यात आले तर गोपाल युवा बिग्रेड रक्तदाते  यांचे संस्थेतर्फे विशेष प्रमाणपत्र देवून गौरविन्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.