योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने विद्यार्थी भरकटतात : विनोद पाटील

0

दिशाच्या एमपीएससी कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी 

सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा कल सध्या स्पर्धा परीक्षांकडे आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी  योग्य मार्गदर्शनाची न मिळाल्याने अनेक विद्यार्थी आजही भरकटत असल्याची खंत  पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी व्यक्त केली.
दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आज शुक्रवार दि.28 जून रोजीएम.पी.एस.सी.बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन म्हणून पोलीस उपनिरिक्षक विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूपाबाबत तसेच कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करावा, कोणते संदर्भ पुस्तके वाचावी, नोट्स कशा काढाव्या याबाबत सांगितले. तसेच बाजारात अनेक प्रकाशनांची पुस्तके उपलब्ध आहेत पण विद्यार्थ्यांना नेमके कोणते पुस्तक कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त असते हे न समजल्याने यश मिळत नाही. केवळ भोकमपट्टी न करता विश्लेषणात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच वेळेत प्रश्न सोडवणे आवश्यक आहे अभ्यासासोबत योग प्राणायाम करण्याचाही सल्ला दिला.सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सुद्धा कल स्पर्धा परीक्षांकडे वळत आहे परंतू त्यांना योग्य  मार्गदर्शन नसल्याने ते भरकटत आहे. मी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगत असतो की ‘दिशा स्पर्धा परीक्षा’ केंद्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व योग्य ‘दिशा’ मिळतेे. मी स्वतः ग्रामीण भागातील असून शुल्लक चुकांमुळे दहा वेळा पी.एस.आय. मुख्य परीक्षा दिली. प्रा.वासुदेव पाटील सरांनी मला वैयक्तिक मार्गदर्शन केल्यामुळे हे यश मी संपादन केले. माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील व ‘दिशा टिम’ला देतो.
आपली यशोगाथा सांगतांना विनोद पाटील म्हणाले की, ‘दिशा’ अभ्यासिकेतील मित्रांची देखील मला खूप मदत झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थींची आर्थिक परिस्थिती खूप हालाकिची असते, पालक आपल्या मुलांची फी भरू शकत नाही, पुस्तके सहजासहजी उपलब्ध होत नाही तेव्हा ‘दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र’ शक्य तेवढी सवलत देऊन विद्यार्थ्यांना घडवत असतात. कार्यशाळेचे प्रस्तावित प्रा.वासुदेव पाटील तर आभार प्रदर्शन प्रा. हेमंत साळुंखे यांनी केले या प्रसंगी प्रा.उमेश सूर्यवंशी, प्रा.कपिलदेव कोळी व श्री.राजेंद्र वाघमारे उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.