माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे प्रतिपादन
चाळीसगाव,दि.24-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी मला जळगांव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविण्याची संधी देण्यात येत असल्याचे सांगितल्यामुळे मी कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आघाडीचा उमेदवार असेल , त्यासाठी कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी आलेल्या आलेल्या गुलाबराव देवकर यांनी चाळीसगाव येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, विविध मुद्यांवर आपली मते व्यक्त केली,या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे भा ज पा चा 2014 चा जो आत्मविश्वास होता तो मावळला आहे, माजी उमेदवारी जाहीर केल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.गुलाबराव देवकर हे पक्षाबरोबर पक्षविरहीत कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे व्यक्तीमत्व आहे.जेथे जातील तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटविण्याची त्यांची कार्यपध्दती जिल्ह्यात वाखाणण्याजोगी आहे म्हणून लोकसभेच्या सर्व उमेदवारांनी गुलाबराव देवकर यांना तिकीट द्यावे ते घेत नसतील तर आमचा विचार करावा असा प्रस्ताव पक्षाकडे ठेवला होता या सर्वांच्या अनुषंगाने देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी आप्पांना उमेदवारी करण्याचा आदेश दिला आहे, जळगाव लोकसभा चे खासदार यांची सोशल मीडिया वर व्हायलर होत असलेल्या क्लीप विषयी पत्रकारांनी विचारले असता, गुलाबराव देवकर यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले,आमची संस्कृती जनतेचे काम करीत राहणे ही आहे,कोणास बदनाम करणे नाही, कोणाचे तिकीट कट करण्यासाठी भा ज पा चे लोक कोणत्या थराला जातील सांगता येत नाही, यावेळी जिल्हा स र्वाधिक मताधिक्य चाळीसगाव तालुक्यातून असेल असा मनोदय माजी आमदार राजीव देशमुख यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर मला पालकमंत्रीपदाची संधी दिली त्या संधीचे सोने करीत जळगांव शहरात अत्याधुनिक असे 30 कोटी रुपयांचे नाट्यगृह उभारले यासह 4 रेल्वे उड्डाणपूल व बलून बंधार्याचा प्रश्न मार्गी लावला यात चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पास चालना देत तळेगाव येथील उड्डाणपूलाचे काम मार्गी लावले यासह अनेक ठोस कामे पुर्णत्वास नेलीत.चाळीसगावचा भूमिपुत्र असल्याने चाळीसगाव येथून प्रचारास सुरुवात करीत कार्यकर्त्याचा आशिर्वाद घेण्यासाठीचा आजचा हा पहिला मेळावा आहे माझ्या कामाची पद्धत सर्वांना ठाऊक असल्याने माझा विजय निश्चित असल्याची भावना यावेळी लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केली.
यावेळी जेष्ठ नेते प्रदीप देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील,युवक माजी जिल्हाध्यक्ष योगेश देसले,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,बाजार समितीचे माजी उपसभापती जालम पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख ईश्वर ठाकरे,जि.प.सदस्य भूषण पाटील,सिताराम चव्हाण,पं.स.अजय पाटील,बाजीराव दौंड,शिवाजी सोनवणे,जिभाऊ पाटील,भाऊसाहेब केदार,विष्णू चकोर,सुनिल माळी,तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,महिला तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे,माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील,शहराध्यक्ष शाम देशमुख,भगवान पाटील,दिपक पाटील,रामचंद्र जाधव,शेखर देशमुख,सदाशिव गवळी,जगदीश चौधरी,प्रवक्ते डी.ओ.पाटील,युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी आदी उपस्थित होते.