यूपीमध्ये हिंसाचार घडवून आणण्याचा कट उधळला

0

नवी दिल्ली :– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी काल (सोमवार) रात्री मोठ्या प्रमाणावर दारु आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. नेहमीच्या तपासणीदरम्यान हा शस्त्रसाठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये ४०५ अवैध हत्यारं, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे

निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने बुलंदशहर जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून नियमितपणे तपासणी होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.