यु.जी.सी. कडून मुळजी जेठा महाविद्यालयास स्वायत्तता प्रदान

0

जळगाव दि.20 –
शैक्षणिक वर्ष 2019 -20 पासून खानदेश कॉलेज एजुकेशन संस्थेच्या मुळजी जेठा महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली द्वारा दहा वर्षासाठी स्वायत्तता (2018-29 साठी ) घोषित केल्याचे पत्र प्राप्त झाले.
ज्ञानप्रसारो व्रतम हे ब्रीद वाक्य घेऊन 1944 मध्ये स्थापन झालेल्या खानदेश कॉलेज एजुकेशन संस्थेने आपल्या कार्यकाळात अनेक विकासपर्व पहिले आणि संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राखत आपल्या सेवेचे पवित्र व्रत सुरु ठेवले आहे .काळाच्या ओघात अनेक बदल स्वीकारत हि संस्था आजपावतो वादातीत व म्हणून पर्यायाने कालातीत चालणारी एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ आहे .त्यामुळे संस्थेला उज्वल भविष्य आहे .
अश्या संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय प्रत्येक शैक्षणिक वर्षात आपले वेगळेपण जपणार्‍या विशिष्ट कार्यपद्धतीद्वारे शैक्षणिक विकासाच्या मार्गावर नेहमीच अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करत असते.गेल्या वर्षी मुळजी जेठा महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करून नवीन मार्गदर्शक तत्वानुसार झालेल्या नॅक पुनर्मुल्यांकनामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेलेच आहे. महाविद्याल्याने सतत तिसर्‍या वेळी नॅकची ए श्रेणी प्राप्त केली आहे .तसेच महाविद्यालयास कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स व त्यानंतर कॉलेज ऑफ एक्सलन्सचा दर्जा प्राप्त झाला .त्यामुळे महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले व त्याचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना झाला.
त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे स्वायत्त महाविद्यालय या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेसाठी गेल्या काही वर्षापासून मु.जे. महाविद्यालय प्रयत्नशील होते. सप्टेंबर 2018 मध्ये महाविद्यालयाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास स्वायत्ततेचा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्ताव विद्यापीठाने शिफारस करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अग्रेषित केला. याकामी विद्यापीठाचे अनमोल सहकार्य लाभले. त्यावर आयोगाने पाच तज्ञांची एक समिती गठीत केली .सदर समितीने दि1 व 2 फेब्रुवारी 2019 रोजी महाविद्यालयास भेट देऊन आपला अहवाल वजा शिफारस आयोगाकडे केली.त्या समितीच्या अहवालास विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी देऊन महाविद्यालयास स्वायत्तता दर्जाफफ प्रदान केल्याचे पत्र पाठविले. त्यामुळे बदलत्या काळानुसार सर्वोत्कृष्टता हे ध्येय समोर ठेऊन मा.अध्यक्ष व त्यांचे सहकरी गेल्या दहा वर्षापासून शैक्षणिक स्वायत्ततेच्या प्रतीक्षेत होते .विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयामुळे होळी पौर्णिमेच्या पवित्र पूर्वसंध्येस हे स्वप्न पूर्ण झाले आहे .त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी प्राचार्य मु.जे.महाविद्यालय डॉ. यु.डी.कुलकर्णी, संस्थेचे शैक्षणिक संचालक प्रा.डॉ.दिलीप हुंडीवाले तसेच प्रा.डॉ.सं.ना.भारंबे व इतर सहकार्‍यांचे अभिनंदन केले.
स्वायत्ततेमुळे महाविद्यालयास आणखी आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे .जून 2019 पासून आता महाविद्यालयाचे स्वत:चे असे अधिक दर्जेदार व उपयोजित असे अभ्यासक्रम असतील .शिक्षककेंद्रित अभ्यासक्रमा ऐवजी विद्यार्थी केंद्रित अभ्यासाक्रमाना प्राधान्य असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त कौशल्यधीष्टीत अभ्यासक्रम राबविण्यावर भर असेल. त्यातूनच अश्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आकार घेईल व त्यांना रोजगाराच्या अनेकविध संधी उपलब्ध होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.