जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पुढील १ वर्षासाठी चोपडा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली, असून सदर चोपडा कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ चोपडा येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.एस.कोसोदे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून युवा परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले, व्याख्याते प्रा.संदीप बी.पाटील, विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. प्रकाश एस.लोहार, संजय गांधी निराधार समितीच्या सदस्या मंगला कैलास पाटील, कवयित्री तथा गझलकार प्रा. सौ.योगिता पाटील – बोरसे, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ॲड.राहूल वाकलकर आदी प्रमुख मान्यवरांसह जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, उपाध्यक्ष दिव्या भोसले, अविनाश जावळे, सचिव आकाश पाटील, आकाश धनगर, कोमल पाटील, समन्वयक नयनकुमार पाटील, मयूर पाटील, अश्विनी पाटील उपस्थित होते.
उपस्थित प्रमूख मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी शैलेश धनगर, दीपक भालेराव, रोहिणी पाटील, सनी पाटील, वैष्णवी सोनवणे, प्रविण पाटील, कामिल तडवी, जयेश सनेर, परेश पवार, प्रविण साळुंखे, तन्मय अहिरराव, विनोद सोये, निलेश भिल्ल, दीपिका निकम, कुलभूषण दोडे, कुणाल सोनवणे, किरण चौधरी, नम्रता अग्रवाल, समाधान कोळी, निखिल पाटील, प्रकाश पाटील यांना नियुक्तिपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन तालुका सचिव कुणाल सोनवणे यांनी केले, तर तालुका उपाध्यक्ष दीपक भालेराव यांनी आभार मानले.