जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा युवा गुरव मंडळातर्फे सरदार वल्लभभाई पटेल कार्यालयात सामूहिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात झाला. यात १४ बटूंची सामूहिक उपनयन संस्कार करण्यात आले. दरम्यान, सकाळी मिनी ट्रेन गाडीतून बटूंची सहवाद्य परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, मंडळाचे अध्यक्ष मुकेश ओगले (गुरव) यांची प्रमुख उपस्थिती होती. १५ वर्षाच्या खंडानंतर प्रथमच युवा गुरव मंडळाने गुरव समाजाचा हा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल आमदार भोळे यांनी कौतूक केले. कार्यक्रमास योगेश गुरव, अमित कारेकर, राजू गुरव, जयंत शिंदे, सचिन शेटे, राहुल गुरव, कैलास ओगले, सागर नाटकर, गौरव गुरव, सारंग करकरे, जयंत गुरव, जगदीश गुरव, सोमनाथ गुरव, नामदेव नेवासकर, राजू नाटकर, सतीश गुरव, प्रकाश नाईक, चंद्रकांत सुरवाळे, सुरेश नाईक, महेश मानेकर आदींचे सहकार्य मिळाले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post