युवासेनेतर्फे शिरसोली येथे शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

0

शिरसोली :- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचे शुभेच्छा बॅनर वायफळ खर्च न करता महाराष्ट्र दुष्काळ परिस्थितीमुळे बेजार शेतकरी व गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थीना मदतीचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी सर्व युवासेना पदाधिकारी यांना केले होते. त्यांचा या आव्हानाला प्रतिसाद देत दि १३ रोजी जळगांव ग्रामीण युवासेना तर्फे शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील. बुलढाणा जिल्हयाचे युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हाधिकारी शिवराज रावसाहेब पाटील, प.स.सदस्य नंदू पाटील, शिरसोली जिल्हा समन्वय जितेंद्र बारी, उपजिल्हाधिकारी विकास पाटील, जळगांव तालुका युवाधिकारी सचिन चौधरी, तालुका सरचिटणीस अविनाश पाटील, पाळधी युवासेना शहर प्रमुख आबा माळी तसेच युवासेना शिवसेना पदाधिकारी शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.