Wednesday, May 25, 2022

युवासेनेच्या भव्य रक्तदान शिबीरात 118 रक्तपिशव्या संकलीत (व्हिडीओ)

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट  शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त काव्यरत्नावली चौक जळगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन युवासेनेतर्फे करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. शिबीराला प्रथम रक्तदाते म्हणून गुणवंत सोनवणे यांनी रक्तदान केले. यानंतर एकूण 118 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून बाळासाहेंबांना अभिवादन केले.

- Advertisement -

थेट लाईव्ह…..👇

यावेळी महापौर जयश्री महाजन व माजी महापौर नितिन लढ्ढा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी  महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी  शिवराज पाटील,  महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, नगरसेवक नितिन बरडे, सरिता माळी-कोल्हे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विकास पाटील, अतुल चौधरीउपजिल्हा युवाधिकारी  पियुष गांधी, समन्वयक जितेंद्र बारी , युवासेना महानगर युवा अधिकारी  स्वप्निल परदेशी, विशाल वाणी,  उपमहानगर युवाधिकारी यश सपकाळे, गिरीष सपकाळे,  सागर हिवराळे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, उपतालुकाप्रमुख अतुल घुगे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड, राकेश चौधरी, निलेश वाघ, आकाश पाटील, अनिल पाटील, महेश सानप, विभाग युवाधिकारी तेजस दुसाने, चेतन कापसे व समस्त युवासैनिक उपस्थित होते.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढी यांचे जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, डॉ. शंकरलाल सोनवणे, सिमा शिंदे, उमाकांत शिंपी यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, राहूल ठाकूर, पवन चव्हाण, मयूर जाधव, परेश चोपडा, सागर सोनवणे, पियुष हसवाल, भुषण सोनवणे, संदिप सुर्यवंशी, इत्यादींनी परिश्रम घेतले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या