युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना काळात युवासेनेने नागरिकांसाठी केलेले आरोग्यविषयक कार्य सर्वांना ज्ञात आहे. सर्व बंद असताना युवासैनिक रस्त्यावर उतरून नागरिकांच्या आरोग्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, होम क्वारंटाईन, कोरोनाविषयी जनजागृती, गरजूंना जेवण वाटप, पोलीस व आरोग्य सेवकांना लागेल ती मदत यासारखे अनेक कार्यामध्ये युवासेनेचे कार्यकर्ते सक्रीय होते.

3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुरूवात करण्यात आली असून जळगाव शहरातील मूळजी जेठा महाविद्यालय, आय.एम.आर. महाविद्यालय, के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, ओरीयन, ए.टी.झांबरे, भगीरथ, रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुल यासह अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन युवासेनेने जळगाव शहर महागनगर पालिका यांच्या सहकार्याने लसीकरण शिबीराचे यशस्वी आयोजन करून घेत अंदाजे 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत लाभ पोहचविला.

शुक्रवारी शहरातील गणेशवाडी भागात युवासेनेतर्फे 15 ते 18 वयोगट तसेच फ्रंटलाइन वर्कर्स व ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोज लसीकरण शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी “युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय व आदर्श आहे” असे उद्गार व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितिन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख राध्येशाम कोगटा, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, महानगर युवा अधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवतीसेना उपशहरप्रमुख वैष्णवी खैरनार, विभाग प्रमुख अमोल मोरे, उमाकांत जाधव, अमित जगताप, शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, प्रकाश कावडीया, जितेंद्र छाजेड, पंकज बिर्ला, रवि शर्मा, नंदू पाटील, कुंदन काळे, चंद्रकांत मराठे आदि उपस्थित होते.

शिबीराचे आयोजन 14 व 15 जानेवारी 2022 दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नानीबाई कॉम्प्लेक्स, गणेशवाडी येथे करण्यात आले होते. तरी जास्तीत नागरिकांनी पुढील लसीकरण शिबिरात लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना सहसचिव विराज कावडीया यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक प्रितम शिंदे, आर्यन सुरवाडे, पवन चव्हाण, समिर कावडीया, पियुष गांधी, यश सपकाळे, हितेश ठाकरे, शंतनू नारखेडे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.