युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते विमोचन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी उत्तर महाराष्ट्र स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन युवासेना व शिवसेनेतर्फे रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड जळगाव येथे करण्यात आले आहे.

गुरुवार रोजी सेना भवन मुंबई येथे पोस्टर व टी-शर्टचे विमोचन वरुणजी सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसैनिक विराज कावडीया, भूषण सोनवणे, सयाजी जाधव व दिनेश पाटील उपस्थित होते. या सह स्पर्धेत खेळण्यात येणाऱ्या बास्केटबॉल व टी-शर्ट वर वरून सरदेसाई यांनी स्वाक्षरी देत शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे मुलं व मुलींचे १० संघ सहभागी होणार असून स्पर्धेला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे.

या वेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शीतलताई शेठ, संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लद्धा, उपमहापौर कुलभूषण पाटील, शोभा चौधरी, युवासेना विस्तारक अजिंक्य चुंभळे, धनश्री कोळगे, रायसोनी महाविद्यालयाचे प्रीतम रायसोनी, डॉक्टर प्रीती अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, स्वप्नील परदेशी, प्रीतम शिंदे, पियुष हसवाल, भूषण सोनवणे, संस्कृती नेवे, नेहल मोडक, सयाजी जाधव, दिनेश पाटील, इत्यादी परिश्रम घेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here