एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल येथील कॉंग्रेसचे नगरसेवक योगेश महाजन यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे .योगेश महाजन यांना त्याची पक्ष निष्ठा चांगल्या संघटन कौशल्य चा बळावर युवक कॉंग्रेस प्रदेश चिटणीस पदी काम करण्याची संधी मिळाली असुन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीने त्याचा कडे निवडणुक नियोजन समन्वयक म्हणुन देखील निवड केलेली असुन सदर समितीत सहा सदस्य आहेत. त्यात योगेश महाजन यांची समन्वयक म्हणुन निवड झालेली आहे समेतीचे मुख्य समन्वयक शिवानी विजय वड्डेटीवार मंत्री विजय वड्डेटीवार यांची कन्या असुन युवक कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष सत्यजित ताबे व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा कडुन नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
त्याचा निवडी प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संदीप भैय्या पाटील मा .खा .उल्हास पाटील प्रदेश सचिव डी.जी .पाटील साहेब प्रवीण वाघ बाळासाहेब पाटील आर.एस.पाटील सर यांनी देखील निवडीचे स्वागत केल आहे.