अमळनेर | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील मांडळ येथे युवक काँग्रेस तर्फे युवक मेळावा घेण्यात आला. नुकताच युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पदी महेश दगडू पाटील यांची निवड करण्यात आली असून मांडळ गावी त्यांनी युवकांचा मेळावा घेत कामाला सुरुवात केली.राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रम युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवक काँग्रेसचे भुसावळ विधानसभा अध्यक्ष इम्रान खान,जळगाव विधानसभा अध्यक्ष पराग घोरपडे,कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ अनिल शिंदे, शहराध्यक्ष मनोज पाटील,सईद तेली,रहेमान खाटीक उपस्थित होते.कार्यक्रमात युवकांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची तयारी दाखवावी.कोणतेही काम कमी किंवा जास्त दर्जाचे नसून त्यासाठी मेहेनत करणे गरजेचे असल्याचे मत युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात डॉ अनिल शिंदे यांनीही महेश पाटलाच्या माध्यमातून तालुक्यातून युवकांची मोठी फळी उभी रहावी असा मानस व्यक्त केला तर शहराध्यक्ष मनोज पाटील यांनीही आम्ही युवकांसाठी सदैव मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.कार्यक्रमात मांडळ गावी युवक कॉग्रेसची शाखेचे उदघाटन करण्यात येऊन शाखाध्यक्ष पदी रिंकेश कोळी,उपाध्यक्षपदी अजय कोळी,अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस च्या उपाध्यक्षपदी तिर्थक देसले,कार्याध्यक्ष पदी गौरव पाटील यांची निवड करण्यात येऊन तेथेच नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी अमळनेर युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौसिफ तेली,घनश्याम महाजन,मयुर पाटील,पंकज पाटील,राहुल पाटील,पवन पाटील, मांडळ सरपंच कैलास कोळी,रमेश पाटील,सुदर्शन पवार,जितेंद्र पाटील, सुरेश पाटील,पराग ठाकरे,तिर्थक देसले,रिंकेश कोळी,अजय कोळी, भावेश निकुंभ,विशाल पाटील,गौरव पाटील,निलेश माळी,भटु पाटील, चेतन पाटील,शादाब तेली,शाहीद तेली,साजिद लोहार,शाहीद बागवान, आदिल सय्यद,अब्दुल पठाण,इद्रिस खान,राजू टेलर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल चौधरी यांनी तर आभार अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश दगडु पाटील यांनी मानले.