निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या कासोदा सह ग्रामिण भागात अनेक कृषी केंद्रांवर युरीया ची कृत्रिम टंचाई भासवून जादा भावाने विक्री केली जात आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने जाब विचारला तर कृषी केंद्र धारक त्या शेतकऱ्याला इतर महागडे रासायनिक खते घ्यायला भाग पाडतात ते जर घेतले नाही तर युरिया जादा भावाने शेतकरी वर्गाला देतात या गोष्टीकडे शासनाच्या कृषी विभागानेजातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या ची गय न करता त्यांचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे सध्या अनेक कृषी केंद्र धारक आपली मग्रुरी दाखवत असून त्यांना कायद्याचा किंवा कृषी अधिकाऱ्यांच्या धाक राहिलेला नाही त्यामुळे मनमानी करुन रासायनिक खते जसे आपल्याच कारखान्यात तयार होते असे समजून जादा भावाने विक्री करतात असे अनधिकृतपणे रासायनिक खते विकणाऱ्यांवर कृषी विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ शेतकरी वर्गाकडून होत आहे.