मुंबई :- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने अखेर सोमवारी युतीची घोषणा केली. युतीच्या निर्णयावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा.नारायण राणे यांनी सडकून टीका केली. भाजपा-शिवसेनेची युती ही जनतेसाठी नव्हे तर वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या फायद्यासाठी युती करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
युती सडली होती असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत होते. मग ते पुन्हा एकत्र का आले. या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. युतीला २५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. तसेच शिवसेनेच्या पराभवासाठी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष प्रयत्न करेन असा इशाराही त्यांनी दिला.