पाचोरा प्रतिनिधी
येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी आज आपल्या हक्काचा म्हणजेच शिवसेना – भाजपा महायुतीचे बालेकिल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रचार रॅली केली. नगरदेवळा परिसर व नेहमीच शिवसेना – भाजपा महायुतीच्या मागे भक्कमपणे उभा राहत आलेला आहे. त्यामुळे या परिसरातुन आमदार किशोर पाटील हे प्रचंड मताधिक्य घेतील असा दावा महायुतीच्या वतीने करण्यात येत आहे. रस्त्यावर थांबणारा आपल्या हक्काचा, आपला जीवा – भावाचा माणूस म्हणून आप्पा यांच्याकडे जनता पाहत असून, पुन्हा आमदार किशोर पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार या परिसरातील जनतेने केला आहे. या परिसरात आमदार किशोर पाटील यांनी प्रचंड विकास कामे केली असल्याने जनता दुसर्याच्या भूल थाप्पांना बळी पडणार नसल्याचे नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसली. या प्रचार दौर्यात त्यांच्या सोबत उपस्थित होते. जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, भैय्या महाजन, प्रदीप परदेशी, राजू जाधव, सागर पाटील, रोहिदास पाटील, संदीप पाटील, शरीफ खाटीक, सोनू परदेशी, गणेश देशमुख, पोपट महाजन, शेख अन्सार शेख अमीर, भाऊसाहेब पाटील,अजय बागुल,जिब्राइल शेख (जिभू भाई), शाम शिंपी, पप्पु परदेशी, विनोद परदेशी, विनोद राऊळ, नाना सोनार, सुनिल मिस्तरी, मनोज गुरव, धर्मराज पाटील, किरण पाटील, स्वरूप राजपूत, वसंत पाटील,धर्मेंद्र राजपूत, राहुल राजूपत, अभिमन निकम, शाम पाटील, पूनम जाधव, विक्की जाधव, सागर जाधव, करण राजपूत आदी शिवसेना, भाजपा पदाधिकारी सह शिवसैनिक व ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.