नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबत ही घोषणा केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे.
1 मेला 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचं काम राज्यांवर 25 टक्के सोपवलं होतं. राज्यांनी आपल्या परीने काम केलं पण हे काम करत असताना किती अडचणी येतात हे लक्षात आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लोकांकडून लशी मागणी वाढली आहे. अशात मोफत लस मिळण्याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असणार आहे.
देशात उत्पादन होणाऱ्या लसींच्या एकूण साठ्यापैकी 25 टक्के साठा खाजगी रुग्णालयांना खरेदी करता येणार आहे. तसेच निर्धारित किमतीपेक्षा फक्त 125 रुपये खासगी रुग्णालयांना अतिरिक्त आकारता येणार आहेत. त्यापेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात सर्वांना लस मिळावी यासाठी मिशन इंद्रधनुष्य लाँच केलं. लहान मुलांना लसीकरण झाले पाहिजे. लहान मुलांची आपल्या देशात काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही लस देण्याचा प्रयत्न केला. पण कोरोनाने विळखा घातला. पण ध्येय स्पष्ट असेल तर कामात तुम्हाला यश मिळतं असं मोदी म्हणाले.