‘या’ औषधाने स्वस्तात वाचवता येणार कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण

0

मुंबई । जगभरात कोरोना व्नेहायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे जगभरात जवळपास साडेचार लाख रुग्ण मरण पावले आहेत आणि बरेच लोक हे जीवन मरणाच्या दारावर उभे आहेत. डेक्सॅमेथेसोन हे औषध अशा रुग्णांसाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. असे मानले जाते आहे की सुरुवातीपासूनच झालेल्या मृत्यूची नोंद घेतली तर असे आढळून आले कि इतर औषधांऐवजी या औषधामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते. एकट्या ब्रिटनमध्येच 5 हजाराहून अधिक लोकांचे जीव वाचू शकले आहेत. यूके येथील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. हे औषध नक्की काय आहे आणि कोरोनामध्ये हे कसे काम करते ते जाणून घेउयात.

डेक्सामेथासोन म्हणजे काय ?

हे सर्वात कमी किंमतीचे स्टेरॉइड आहे जे भारतात सर्वत्र उपलब्ध आहे. हे औषध आधीच संधिवात, रक्त रोग आणि जळजळ कमी करण्यासाठी वापरले जात आहे. तसेच, हे औषध अ‍ॅलर्जी आणि त्वचेच्या अनेक रोगांमध्ये देखील दिले जाते. आतापर्यंत हे औषध भारतात कोरोनाच्या उपचारांसाठी दिले जात नाही आहे.

गंभीर परिस्थिती असलेल्या कोरोना रूग्णांची स्थिती सुधारण्यासाठी जगभरातील डॉक्टर हे औषध देत आहेत. बर्‍याच ठिकाणी स्वतंत्रपणे त्याच्या ट्रायलही सुरु आहेत. या ट्रायलसाठी 2104 रूग्णांना घेण्यात आले आणि त्यांना सतत 10 दिवसांसाठी 6 मिलीग्राम एवढे हे औषध दिले गेले. यासह, त्यांची तुलना अशा 4321 रुग्णांशी केली गेली, ज्यांना हे औषध दिले जात नव्हते. ऑक्सफोर्ड विद्यापीठात हा प्रयोग झाला.

प्रयोगाचे परिणाम काय होते ?

यामध्ये असे आढळून आले आहे की, ज्या रुग्णांना कोरोनाच्या गंभीरतेमुळे व्हेंटिलेटर द्यावे लागले, डेक्सामेथासोनच्या तुलनेत त्यांच्या मृत्यूचा धोका हा एक तृतीयांश कमी केला जाऊ शकतो,तसेच ज्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो त्यांच्या मृत्यूचा धोका हा पाचव्या टप्प्याच्या फरकाने कमी होईल. मात्र, ही एक बाब देखील आहे की ज्यांची परिस्थिती गंभीर नाही किंवा ऑक्सिजनची आवश्यकता नाही अशा रूग्णांवर या औषधाचा कोणताही परिणाम दिसला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.