यावल (प्रतिनीधी) : यावल शहर सह परिसरात व तालुक्यात काही दिवसांपासून , मोठ्या प्रमाणावर डेरेदार वृक्षांची अवैध वृक्षतोड करुन लाकूडचोरी केली जात असून वनविभागाचे अधिकारी मात्र या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या तस्करांना आता कोणाचाही धाक राहिलेला नसून दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड करुन लाकूडचोरी होत असल्याचे दिसून येत आहे.
मनसे चे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळ कर यांनी पकडलेला अवैध्द लाकडाच्या साठ्याची वन अधिकारी यांना माहीती देताच अचानक भरलेला लाकडांचा ट्रक्टर होतोय गायब
यावल येथे दही गाव रस्त्यावर अवैध्द लाकडांची वाहतुक सुरू असल्याची माहिती मनसे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनां कळताच त्यानी स्वतह लक्ष देऊन अवैद्ध वृक्षाची भरलेली ट्राली ट्रक्टर सहीत थांबवली पण अवैद्द वाहतुक करणारे फार मुजोर असल्यामुळे त्यांनी त्याची माहीती . वन अधिकारी पुर्व विभाग विक्रम पदमोर व वन अधिकारी पश्चिम विभाग विशाल कुटे यांना भ्रमण ध्वनी वर कळवली पण त्यांनी काहीही एक न सांगता. वाहतुक.विषयी बोलणे टाळले व .त्यानंतर थोड्याच वेळाने जप्त केलेला साठा अचानक गायब झाला.गायब झाला की करण्यात आला? इतक्या मोठ्या भरलेल्या अवैध्द लाकडाची भरलेली ट्रक्टरची ट्राली नेमकी गेली कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणाच्या आशिर्वादाने ही वाहतुक सुरू आहे ? यामध्ये लाकूड तस्कर व वनविभागाचे अधिकारी यांची अर्थपूर्ण भागीदारी तर नाही ना? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
जर हे होणारी अवैध्द वृक्षाची वाहतुक वन अधिकारी यावल यांनी न थांबवली आणि त्याच्या वर नियमानुसार कार्यवाही केली नाही तर मी . वन विभाग जिल्हा नाशिक आयुक्त व वनमंत्री . यांच्या शी स्वतह भेट घेउन अशा भष्ट्राचारी अधिकारी यांची निलंबनाची मागणी करेल अशी माहीती चेतन अढळ कर यांनी दै. लोकशाही प्रतिनीधी यावल यांच्याशी बोलतांना दिली.