यावल शहरात मतदारांमध्ये मोठा उत्साह; शासनाचे नियोजन संशयास्पद

0

यावल : शहरात आज सकाळी सात वाजेपासून सर्व मतदान केंद्रावर मोठा उत्साह दिसून आला प्रत्येक मतदार स्वेच्छेने मतदान केंद्रावर मतदानासाठी शांततेने येताना तसेच रांगेत नंबर लावताना दिसून आले. अनेक मतदारांच्या घरी मतदान केंद्र व यादी भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, यादी भागाचे नावाची चिठ्ठी संबंधित काही बी एलओ कर्मचाऱ्यांनी घरपोच न केल्याने मतदारांना मोठी भटकंती करावी लागत असल्याचे सुद्धा दिसून आले. तर यावल शहरातील बालसंस्कार विद्यामंदिरातील मतदान केंद्रातील उत्तरेकडील खोलीतील ईव्हीएम मशीन सुरुवातीलाच सुमारे एक तास सुरू न झाल्याने तसेच पर्यायी व्यवस्था करण्यास एक तास लागल्याने मतदारांना एक तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. नवीन तथा दुसरे ईव्हीएम मशीन आणल्यावर मतदान सुरू झाले.

काही पोलिसांनी कर्तव्याचा मोठा देखावा करून मतदान केंद्रात फोटो काढू नका, व्हिडिओ शूटिंग करू नका, मतदान केंद्राध्यक्ष यांची परवानगी घ्या असे पत्रकारांना सांगितले एका पत्रकाराने यावल तहसीलदार साहेब यांना फोन लावून एक समस्या सांगितली असता मला तो अधिकार नाही उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गाडीलकर यांना फोन लावून तुम्ही विचारा असे असमाधानकारक उत्तर दिले. मतदान प्रक्रियेत 80 टक्के कर्मचार्‍यांना अनोळखी ठिकाणी नियुक्त करण्यात आल्याचे तर दहा टक्के वशिलेबाजी वाले तसेच प्रभाव टाकणारे, भेदभाव करणारे कर्मचारी ओळखीचे यावल शहरातच दिसून आले. मतदारांना मतदान करण्यासाठी आणि मतदान केंद्राचे मार्गदर्शन करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, मतदारांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन प्रोत्साहन करताना दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.