यावल शहरातील विस्तारीत भागातील पाईप लाईन कामाची लोकप्रतिनिधी कडून पाहणी.

0

यावल प्रतिनिधी । शहरातील विस्तारित भागात नगरपालिकेकडून ऑगस्ट २०२० पासुन सुरू करण्यात आलेल्या नविन जलवाहिका टाकण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. व विविध ठिकाणी आता टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची जोडणी  सध्या सुरू आहे. तेव्हा सदरील काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची स्वत:हा पाहणी लेकप्रतिनिधींकडून केली जात आहे. पाईपलाईन टाकण्यात साठी खोदकाम मुळे खराब झालेला रस्ता दुरूस्ती देखील तातळीने करावी अशा सुचना प्रसंगी मक्तेदारा देण्यात आली आहे. पाइपलाइन सह रस्ता दुरूस्ती करीता एकुण ३ कोटी ६५ लक्ष रूपयांचा निधी मंजुर आहे.

शहरातील विस्तारीत भागातील उभारण्यात आलेल्या जलकुंभातुन विस्तारीत भागात जल वाहिन्या टाकण्याचे काम ऑगस्ट २०२० मध्ये सुरू झाले होते. विस्तारीत भागात ३. ६५ कोटीतुन २२ कालॅन्यांमध्ये २३ कि.मी. अंतराची पाईपलाईन टाकली  जात आहे तसेच याचं निधीतुन पाईप लाइन टाकतांना खराब झालेला रस्ता दुरूस्तीची देखील तरतूद असुन पाईप लाइनचे काम अंतिम टप्प्यात आहे व विविध ठिकाणी टाकलेल्या जलवाहिका एका- मेका सोबत जोडण्यात येत आहे तेव्हा नुकतेच आयेशा नगरात सदरील काम हे व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्या करीता माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता अतुल पाटील, नगरसेवक शेख असलम शेख नबी हे दाखल झाले व त्यांना स्वत :हा या भागात थांबून काम कशा प्रकारे होत आहे याची पाहणी केली तसेच याl कामा नंतर खराब झालेला रस्ता देखील तातळीने दुरूस्त केला जावा अशा सुचना प्रसंगी मक्तदारास त्यांनी केल्या आहे

Leave A Reply

Your email address will not be published.