यावल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

0

यावल : सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. ही महामारी कमी व्हावी म्हणून महाराष्ट्रमध्ये सरकार  व प्रशासन  तत्परतेने काम करत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डाभुर्णी  येथे  जाऊन समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांचे पुष्प गुच्छ व सन्मान पत्र  देउुन सन्मानित करण्यात आले व ऋण व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्य अध्यक्ष रविद्र नाना पाटील यांच्या संकल्पना व मार्गशन खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी यावल तालुका   वैद्यकीय अधिकारी डॉ मनीषा महाजन त्यांचे सर्व सहकारी आणि आशा वर्कर, व अंगणवाडी सेविका कर्मचारी, वाहक तडवी  यांचा सत्कार युवक राष्ट्रवादी यावल च्या वतीने करण्यात आला. डॉ मनीषा मॅडम यांचा सत्कार आयोजक राज भाऊ कोळी आणि देवकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याचं बरोबर आरोग्य विभागाचे डॉ सागर वरके, मंगला सोनवणे , जे के सोनवणे ,प्रतिभा सोंनवणे डाभुर्णी प्राथमिक केंद्राचे आशा वर्कर्स ,आंगण वाडी सेविका ,अंगणवाडी मदतनीस यांचा देखील कोरोना योद्धा म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शॉल श्रीफळ प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुछ देऊन गौरव सत्कार करण्यात आला .

या वेळी आयोग्य विभागाच्या प्रमुख डॉ मनीषा मॅडम यांनी यावल तालुक्यात प्रत्येक प्राथमिक केंद्रात त ऑक्सिजन साठी लागणारे  Oxygen concentrator हे  मशीन लोक सहभागातून घ्यावे. आणि आरोग्य विभाग आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँगेसचे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील, उपजिल्ह्याअध्यक्ष राज कोळी, सरचिटणीस विनोद पाटील, सरचिटणीस प्रशांत पाटील, लीलाधर चौधरी, प्रमोद आबा, कुणाल चौधरी, भूषण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन आणि प्रास्ताविक  युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार राज कोळी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.