यावल येथे वीजबिलांची होळी

0

यावल ( प्रतिनिधी ) राज्यात मागील सहा महीन्यांच्या कालावधीत संपुर्ण  कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीत नागरीकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले असतांना या काळातील सर्वसामान्य नागरिकांचे संपुर्ण विजबिल माफ करू असे आश्वासन व घोषणा  करणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी शासनाने आपला लॉक डाऊनच्या काळातीत दिलेल्या शब्द पाळला नसल्याने शासनाच्या कारभारा विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावल विजबिल जाळुन आंदोलन करण्यात आले . यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारा जवळ आज करण्यात आलेल्या महाविकास आघाडी शासनाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या विजबिल जाळा या आंदोलनात भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , माजी तालुका अध्यक्ष डॉ . नरेन्द्र कोल्हे , कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी , यावल पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी ,कृउबाचे संचालक व राकेश फेगडे , कृउबाच्या संचालीका सौ . कांचन फालक , जिल्हा परिषद सदस्या सौ . सविता भालेराव , यावलचे नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , किशोर कुलकर्णी , खरेदी विक्री संघाचे संचालक गणेश गिरधर नेहते , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत , पुरूजीत चौधरी ,  विलास चौधरी यांच्यासह पक्षाच्या विविध विभागातील  पदाधिकारी यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला . या आंदोलनात भाजपाच्या वतीने विज बिलांची होळी करून  शासन विरोधात घोषणा देण्यात आल्यात .

Leave A Reply

Your email address will not be published.